Wednesday, June 30, 2010

प्रेम

काहींचे प्रेम एका नजरेत जडते ,
काहींच्या नजरा न जुडता .

काही जण भेटीच्या आशेत राहतात,
तर काही न भेटता प्रेमात पडतात.

काहीना प्रेम साठी शब्द पुरात नाहीत...
तर काहीना तर तेही आठवत नाहीत.

काहीजण प्रेम करतात विसरून जगाला ..
तर काही जण स्वतःला .

मात्र एकदा प्रेमात पडल्यावर ...

काहीजण विणतात गाठी नवीन स्वप्नांच्या ,
तर काही गुंततात गाठीत अपेक्षांच्या.

सौम्य नजरांनी जडलेले प्रेम .....
केव्हा नजरा भिडवायला लागते .. कळतही नाही !

वाढलेल्या भेटी आणि अनायासे वाढलेला खर्च ...
कधी त्यांचा हिशेब मांडला जातो ... कळतही नाही !

भेटी साठी आसुरलेले जीव ...
केव्हा प्रतीक्षेचा तिटकारा करतात ... कळतही नाही !

Wednesday, June 16, 2010

मृगजळ

खरच हे जीवन एका मृगजळा सारखेच आहे.
सदैव माणूस न मिळणाऱ्या गोष्टींच्या,
ध्यासाने चालत राहतो .. धडपडतो .

कित्येकदा मृगजळ समजून तो ,
हातातल्या गोष्टीनाही भ्रम समजतो.

खरच ह्याचे अस्तित्व कोण बरे ठरवितो ?
आपले डोळे , मन , का आपला मेंदू ?

एका अर्थाने पाहिले तर हे पडसाद आहेत,
थकलेल्या , हरलेल्या मनाचे ...
जे गाठू पाहतात स्वप्ने अल्पश्या प्रयत्नांत...

पण काहीना हे मृगजळ , म्हणजे असते
अशा , उमेद .....
जी हाथ देते निराशेच्या भवसागरातून.
ओढ जिची घेते सर्व संकटांचा समाचार.

मग ह्याला खोट मानून त्रस्त व्हायचं ?
का ह्याचे अस्तित्व जाणून प्रयत्नात राहायचं ?