एक नाजूक चंद्राची कोर, जात होती ढगांच्या आड,
जाहली आठवण हसऱ्या चेहऱ्याची तुझ्या, जाताना नजरे आड.
विखुरतील ढग बाजूला , आणि येईल ती समोर ...
पण आणू कशी तुला , प्रत्यक्षात नजरे समोर .
चांदण्यांना विरह चंद्र कोरीचा, फक्त अमावास्येला ...
दुरावा तुझा सोबतीला माझ्या, जीवनाच्या प्रत्येक क्षणाला.
ह्या अंतराची लांबी , खरच तू पण मोजत असशील काय ?
कधी पाहिलास चंद्र ,तर त्यात मला शोधशील काय ?