तुझ्या प्रश्नाचे उत्तर शोधतोय मी ..
पण एकीकडे शृंखला माझ्या प्रश्नाची जोडतोय मी .
वाट तुझी पाहता पाहता ...
घडी निसटनाऱ्या क्षणांची मोजतोय मी .
एकाकी तुझ्या भेटण्यातला ...
तो एकटे पणा शोधतोय मी.
गोड तुझ्या त्या बोलण्यातला ....
हरवलेला गोडवा शोधतोय मी.
हसताना पडणाऱ्या त्या नाजूक खळीला ...
न उमललेल्या ह्या कळ्यान मध्ये शोधतोय मी .
अन दूर गेलेल्या तुला शोधताना ...
स्वतःला कुठेतरी हळू हळू हरवतोय मी ...