आजही माझ्या हसऱ्या चेहऱ्याला का तू साशांकातेस ?
आजही त्या गप्प बसण्याला का तू रागावतेस .... ?
जवळ येताना तू , दुरावणार कधीतरी जाणार .. जाण ह्याची होती ..
क्षण हा दुराव्याचा येत असे नजरेसमोर .. नेहमी तुझ्याशी बोलण्या अगोदर
निवड अन आवड ही माझीच होती ... पूर्व संकेत असताना ही सर्व
ह्या विचारांवर आजही हसतो स्वतःवर ... दूर जाणाऱ्या माझ्याच सावलीवर
शब्द आजही ही फुटत नाहीत ... तुला थांब म्हणायला ...
हसू चेहऱ्यावरचे मात्र हरवेल नंतर ...
धुंडताना अंधारात .. हरवलेल्या माझ्या सावलीला
Thursday, March 29, 2012
Wednesday, March 28, 2012
relations
नात्यांचं आणि फुलांचं दोघांच एक सारखं असत ...
कळी पासून फुलायला आणि मनापासून जुळायला
दोघांच्या वेळेच एकाच खात ..
नात्यांचं आणि ढगांचं , दोघांचही सारखच असत ..
जेवढे गाढ रंगांचे दोघे .. तेवढ्याच आनंदाच्या वर्षावात मन सतत असत ...
नात्यांचं आणि पाखराचं .. ह्याचं पण सारखच ..
स्वतंत्र भिरभिरतात मुक्त आसमंतात ....
पण निवारा घेतात आपल्या घरट्यात
पण नात्याचं आणि मनाचं .. फार क्वचितच जुळत
दूर जाणाऱ्या मनाला मात्र .. नात्याचं कधी भानच नसत ......
Sunday, March 25, 2012
तू असता समोर ही..
आठवणींचा उजाळा आजही आहे डोळ्यां समोर ,
उजळणी त्यांची कशी करू एकट्या मना समोर.
हातांनीही एकटेपणा जाणून मिटली बोटे स्वतःत
एकटेपणाचे मन बिचारे गुंतले आजही तुझ्यात
सवय विभक्तीची मला अशी ही नको जडूदे
तू असता समोर ही.. मनाने मात्र तुलाच धुंडूदे ....
उजळणी त्यांची कशी करू एकट्या मना समोर.
हातांनीही एकटेपणा जाणून मिटली बोटे स्वतःत
एकटेपणाचे मन बिचारे गुंतले आजही तुझ्यात
सवय विभक्तीची मला अशी ही नको जडूदे
तू असता समोर ही.. मनाने मात्र तुलाच धुंडूदे ....
Subscribe to:
Posts (Atom)