पाणी अन मन दोघांच एक सारखच असत ,
एकदम स्वच्छ , ज्यात मिसळल त्याचच
ते
असत ..
पाणी अन मन दोघांच जुळत असत ,
एक दुखवल तर दुसर डोळ्यातून बाहेर पडत.
पाणी अन मन याचं सारखं असत,
थांबल्यावर एक खोलवर जिरत .. तर दुसर खोलवर झुरत .
पाणी अन मन याचं सारखं असत,
एक वाहताना मागे ओलावा सांडत ...
अन दुसर हसर मागे मनांना जोडून जात .
पाणी अन मन याचं सारखं असत,
जगण्यासाठी दोघांच आयुष्यात समप्रमाण लागत .
पाणी अन मन याचं सारखं असत,
एकाला पूर तर दुसर्याला उद्रेक असतो .
पाण्यावर आपण बांध घालू शकतो ..
पण मनाला बांधन कधी जमलं का कुणाला !