पाउल पुढे टाकताना .
खुणा मागे सोडून जाते ..
पाउल पुढे टाकताना ..
मातीही सोबतीस येते .
पाउल पुढे सरकता ..
अंतर मागील वाढते .
पाउल पुढे सरकता ..
पुढचे अंतर सरते .
पाउल थांबता एक ठिकाणी ..
विश्रांती जीवाला मिळते .
पाउल थांबता वाटेवर ..
वादळ मनात परत फिरकावते ..
अन त्या वादळातल पाउल मग ..
पुढे सरकण्यास पण अडखळते