अहंकार आणि प्रतिष्ठे पायी अनेक मने चीरडताना ,
जाणीवा तुम्हाला होते, तळपायास रंग लाल लागताना .
मन स्वतःचे मोठे दाखविण्याचा प्रयत्न करताना,
फ़क़्त तुम्हीच उरता सामावताना इतरांना.
मोठेपण अन त्याग तुमचा कुठून तरी शोधता,
अन वास्तविकता लपवण्यात सदैव आक्रोश करता.
स्वार्थ पूर्ण होता जग गोजिरे भासवता ,
अन त्यात अडचणी दिसता तुम्हीच क्लेश करता .
भरोसा तोवर जोवर जग फिरते गोल ,
अविश्वासू दुनिया असे अंधारात येतात बोल .
नाती परंपरा ह्या फ़क़्त तुम्हास ठावूक,
पण नात्यां साठी आम्ही नेहमीच भावूक .
अस्थिर मन तुमचे पाहते जगाच्या परीक्षा ,
पण उत्तर पत्रिकेने तुमच्या सदैव इतरांच्या उपेक्षा .
सूर्यमालेचा केंद्र, सूर्यही कधी ग्राहणास जातो,
पण अहंकार तुमचा नेहमी ग्रासत असतो .