Wednesday, September 15, 2010

कधी पाहिलास चंद्र तर .....

एक नाजूक चंद्राची कोर, जात होती ढगांच्या आड,
जाहली आठवण हसऱ्या चेहऱ्याची तुझ्या, जाताना नजरे आड.

विखुरतील ढग बाजूला , आणि येईल ती समोर ...
पण आणू कशी तुला , प्रत्यक्षात नजरे समोर .

चांदण्यांना विरह चंद्र कोरीचा, फक्त अमावास्येला ...
दुरावा तुझा सोबतीला माझ्या, जीवनाच्या प्रत्येक क्षणाला.

ह्या अंतराची लांबी , खरच तू पण मोजत असशील काय ?
कधी पाहिलास चंद्र ,तर त्यात मला शोधशील काय ?

Monday, August 30, 2010

nandanlive: Mazya Bhavan

nandanlive: Marathi kavita

nandanlive: Aaj Raani

nandanlive: Vidamban "Aaj Rani Purvichi .."

ticha hokaar

nandanlive
हे विचार आहेत एका मुलाचे .. जो वाट पाहत आहे तिच्या होकाराची (अथवा नकार)....
जो तिने समोरा-समोर देण्यास टाळला ..


आज reply येईल अस कदाचित होईल अस नाहीच ...
वाटल पाठवाव एक email (sms ) त्या अगोदरच ...

काळजी घे स्वतःची तु कदाचित माझ्या साठीच ..
मिळाला जर वेळ तुला थोडासा, तर पाठव reply लागलीच....

आठवणींनी तुझ्या जरी असेल माझे network जाम ..
लोड शेडींग ने जरी केले battery चे पुरते काम ...

balance नव्हता म्हणून तू वेळ नको मारू ....
एक reply पाठवण्यासाठी तू वेळ नको लावू ...

घेणार नाही वेळ तुझा , आठवणी भेटीच्या सांगून ..
जरी नसेल मनात तुझ्या, तरी बोल ते मागून ..

नसेल बोलायचे तुला, तर पाठव एक smiley ..
तिच्या कडे पाहून वाटेल, तुझी भेट मला लाभली.

Wednesday, July 7, 2010

Vidamban

मूळ कविता "आज राणी पूर्वीची "
http://www.onesmartclick.com/marathi/bhavgite/aaj_rani.gif

आज राणी पुर्विचेते गिफ्ट तू मागू नको,
कालचे महाग बुके चे बिल तू आठवू नको |

वीकेंडला मौल च्या बाहेर नेहमीचे ते भेटणे,
ब्रान्डच्या मोठ्या दुकानाने लक्ष तुझे वेधणे ,
त्या चमकत्या एवजांची भेट तू मागू नको,
आज राणी पुर्विचेते गिफ्ट तू मागू नको |

खरेदीचे शब्द ओठी तू हळू निश्वसता,
वाजती रडण्याचे गाणे नजर हळूच फिरविता,
त्या फिरण्याची अन खर्चाही आठवण तू काढू नको,
आज राणी पुर्विचेते गिफ्ट तू मागू नको|

रोखुनी पलकांत पाणी घाव सारे साहिले,
अन रिकाम्या पाकिटाचे , मीठ डोळ्या चोळीले,
या घडीला मोतियांचा हार तू मागू नको,
आज राणी पुर्विचेते गिफ्ट तू मागू नको.

काय बोलू धाप लागे ,क्रेडीट कार्डाचे बिल पाहिले का?
पगार क्रेडीट होण्याचे सुख कधी , बँक अकाउंटला लाभेल का?
नित नवी बिले भराया कार्ड तू मागू नको .
आज राणी पुर्विचेते गिफ्ट तू मागू नको.

---------------------------------------
विशेष आभार मित्रांचे,ज्यांनी काही अवघड शब्दांचे अर्थ समजावून सांगितले.

Thursday, July 1, 2010

संवेदना

सं + वेदना .. कदाचित हीच असावी फोड ,
या शब्दाची ....

दुसर्यांना होणाऱ्या वेदना ....
ज्या शाररीक असो अथवा मानसिक ...
जो जोडतो स्वतःशी तोच जाणवतो ,
संवेदना दुसर्यांच्या दुखाची.

वेदना दुरावते लोकांना दुखाःमुळे,
तर संवेदना जोडते दुखीजानांना.

जर खरच असतील संवेदना तुमच्यात,
देणार नाही वेदना इतरांना जीवनात.