शांत ही बसण्यासाठी खूप विचार करावा लागला ....
अन शब्द ही मिळेनात म्हणून हा जीव कासाविसाला ..
प्रश्न ही माझेच होते आणि समस्या ही माझ्या मनात..
तुला त्या न समजाव्या , हीच खंत प्रश्नात ..
प्रश्न तुला माझे ना उमगले .. अन नाही समजले ..
त्याच प्रश्नांनी आजही मला , माझेच अस्तित्व विचारले ..
चार क्षणाच्या सोबतीत जरी भांडलो कित्येकदा ..
आठवतात ते क्षण अजुन ही .. भासतात समोर अनेकदा
सर्व सोडले असता नियतीवर, वाट पाहत होतो आपण ..
पण सूत्रे घेता नियती कडून ... मन अधीर जाहले संपूर्ण ...
आजही परिस्थती तीच .. जी होती सुरुवातीला ..
पण पाय पुढे मी टाकताच का , दगड समोरचा ढेसळला ?
रुतलेला पाय काढेन प्रयत्नांनी आज वा उद्या ...
ह्या परिस्थितीत जमलंच तर दुरूनच का होइना , साथ तुमची असुद्या ...
No comments:
Post a Comment