Thursday, May 5, 2016

प्रश्न तुझे




प्रश्न तुझे आजही तसेच दिसतायेत 
जे उत्तरात गरज मजला  भासावतायेत . 

तुझे प्रश्न फ़क़्त तुझ्या समस्या दाखवतात . 
अन उत्तरात मात्र मला दोष देतात . 

निर्णयांना तू  माझी संमती विचारतेस  . 
पण प्रसंगाचं कारण स्वतः विसरतेस . 

दूर गेल्यावर अंतराचे मोजमाप विचारतेस . 
पण अंतराला वाढताना पाहणाऱ्या मनाला विसरतेस.

त्रास परिस्थितीचा  होता कि माझा ,
अनुकुलातेची अशा हि ठरत होती निराशा . 

कधी चांगला भासतो तर क्रूर कधी  ,
मलाच समजेना बदलतेय कृती कि द्रुष्टी . 

No comments:

Post a Comment