Sunday, October 24, 2010

nandanlive: गुंतले हे मन

nandanlive: गुंतले हे मन

गुंतले हे मन

गुंतण्याचे काम आहे विखुरलेल्या धाग्यांचे ,
अन गुंतते मन रिकामे, त्या विखुरलेल्या स्वप्नांत .

विखुरतात धागे छिन्न- विच्छिन्न झालेल्या वस्त्रातून.
अन विखुरतात स्वप्ने माझी , भंगलेल्या त्या वचानांतून.

गुंतले होते तेच धागे विणण्यास वस्त्राला.
अन होता आधार तुझ्या वचनांचा माझ्या मनाला.

आज जाहलेत मोकळे दोघे ही ..
जरी गुंतातील धागे नवीन वस्त्र विणण्यात ...
गुंतेल का हे मन माझे एखाद्या नवीन स्वप्नात.

nandanlive: जमलं नसेल मला ....

nandanlive: जमलं नसेल मला ....

जमलं नसेल मला ....

जमलं नाही कधी खोट बोलणे तुझ्याशी ....
जमलं नाही हसण खोट, माझ्या रागाशी ....

जमलं नाही रागवण तुझ्या प्रश्नांशी ....
जमलं नाही पूर्ण जुळणं, तुझ्या विचाराशी ...

जमलं नाही वेळेला थांबवण मिळता तुझ्याशी ....
अन नाही जमलं थांबवण तुला, त्या संपत्या घटकेशी ..

नसेल जमत एवढ तरी ... कदाचित जमलं असेल मला ,
जुळणं तुझ्या विश्वासाशी , तुझ्या मनाशी ......

Sunday, October 10, 2010

मुखवटे

आजच्या युगात झालोत पारखे आपण चेहऱ्यांना,
वावरतोय जगात ओढून मुखवट्यांना .

कुणास आवडतो मुखवटा हसरा,
तर काही पांघरतात रागावलेला.

घुसमटतात चहरे कित्येकांचे ओढलेल्या आवरणात,
काहींचे तर रूप बदलते, मिथ्या जगास दाखवण्यात.

गर्दीत मुखवट्यांच्या काही मुखवटे भासतात आवडणारे ..
न जाणता गुंततात काही त्यांच्या प्रेमळ भासात.

अन उतरता तो मुखवटा प्रेमळ हास्याचा ..
मिळतो का पहा कुठे मुखवटा सदा हसणाऱ्या हृदयाचा ?

मुखवटे चेहऱ्यांचे कदाचित दिसतील डोळ्यांना ..
पण हृदयाचा मुखवटा कसा जाणवेल ह्या मनाला ..

पाहूया दिवसा तर नाही .. पण रात्री तरी एखाद वेळी.
वाटेल का पहावसे दर्पण स्वतःचे विना आवरण.