गुंतण्याचे काम आहे विखुरलेल्या धाग्यांचे ,
अन गुंतते मन रिकामे, त्या विखुरलेल्या स्वप्नांत .
विखुरतात धागे छिन्न- विच्छिन्न झालेल्या वस्त्रातून.
अन विखुरतात स्वप्ने माझी , भंगलेल्या त्या वचानांतून.
गुंतले होते तेच धागे विणण्यास वस्त्राला.
अन होता आधार तुझ्या वचनांचा माझ्या मनाला.
आज जाहलेत मोकळे दोघे ही ..
जरी गुंतातील धागे नवीन वस्त्र विणण्यात ...
गुंतेल का हे मन माझे एखाद्या नवीन स्वप्नात.
No comments:
Post a Comment