Monday, January 30, 2012

त्या दूर वसलेल्या मनाला ...

औपचारिकता ही फ़क़्त आचरणाचे धडे शिकवते ..
वास्तविकता मात्र जीवन जगायला शिकवते ....

आईची ममता आयुष्याला सुरवात करून देते ..
ताईची माया तुमच्या चुकांना सामावून घेते ..

भाऊ जरी मोठा असला तरी ओरडून सांभाळतो ..
आणि बाबा जरी रागीट असले तरी मनातला भाव त्यांच्या दिसतो ..

आणखी नाती जोडतो आपण काही मैत्रीची , तर काही मनाची ..
पण त्या प्रत्येक नात्यांतून जडते सवय आपुलकीची ..

कदाचित ही सवय , आपुलकी , आणि बंध ...
हेच जोडतात एकमेकांना किंबहुना मनांना, किंवा म्हणा घराला ..

ह्यातल्या एकही धाग्याची उणीव जर भासली ..
तर दुसरा पुढे सरसावतो .. समजावतो ..

पण दूर वसलेल्या मनाला ... जेव्हा ओढलागते नात्यांची ...
अंतरे कापताना ही त्याला .. शुद्ध नसते स्वतःची ...

आजही ती मने तशीच असतील का ? आजही मला जवळ घेतील का ?
का दुरावा अंतरांचा बनतोय दुरावा विचारांचा ?

तेच घर तीच नाती .. तीच मने आणि तीच माणसे ..
समजतील का त्या दूर वसलेल्या मनाला ... आजही ...

Friday, January 27, 2012

सोडता हात साथीचे

दुपार काही सरत नाही .. सांज ही जवळ येत नाही ..
आज ही जगताना स्वप्नात ... आठवण तिची जात नाही ..

तिच्या दुखःला सोबत सदा, त्या साथ न देणाऱ्या नशिबाची ..
पण मी मात्र त्या दुखःतही शोधतो साथ आजही तिची ..

बोलताना आजही कुठे वाटते, उणीव त्या जाणिवेची ...
जी दबली दोघांची , सोडता हात ते साथीचे ....

आज थांबवताना तुला कधी हात पुढे नाही सरसावणार ...
पण पापण्यांची ती धडपड... कदाचित आजही नाही थांबणार ...

Saturday, January 21, 2012

nandanlive: ती एक भेट ...

nandanlive: ती एक भेट ...

ती एक भेट ...

काही भेटी निरंतर आठवणीत राहतात ...
तर काही भेटी अखेरच्या ठरतात ...

काही भेटींना आपण विसरू नाही शकत ...
तर काहीना भेटतो विसरण्यासाठी ..

काही भेटी एकमेकांना समजण्यासाठी ..
तर काही भेटी समजावण्यासाठी .

काही असतात नैमित्तिक ..
तर काहींना सतत शोधतो निमित्त.

काही भेटी मध्ये उलगडतो जाळे प्रश्नाचे ..
तर काहीं मध्ये गुंततात गाठी अनेक प्रश्नांच्या ...

काही भेटी असतात क्षणभर ..
तर काहींना असतात अपुरे सारे क्षण .

सुरुवात असो की शेवट ..
पण सगळ्यात निश्चित असते ती एक भेट .

Wednesday, January 11, 2012

nandanlive: मन ही मज जवळ नाही ..

nandanlive: मन ही मज जवळ नाही ..

मन ही मज जवळ नाही ..

छान बोलतोस तू अस जेव्हा ती म्हणते ...
मन तेव्हा म्हणत तुलाच एकाव असं मला वाटते ..

कविता ही छान करतोस अस जेव्हा ती म्हणते ...
मन तेव्हा म्हणत तुलाच स्मरुण ती सुचते ...

कधी ती म्हणते , खूप हळवा आहेस तू ...
मन तेव्हा म्हणत , झालोय जशी आहेस तू ..

कधी ती विचारते , काय करत आहेस ...
तिला कोणी सांगाव मनात तूच आहेस ...

कधी ती म्हणते .. जमेल का माझी सोबत ...
मन तेव्हा म्हणत .. असावी तुझीच संगत ...

कधी ती म्हणते ... मार्ग आपले वेगळे झाले तर ...
तेव्हा मन मात्र काहीही म्हणत नाही .

आज तीने विचारलं नाही , अन ती समोरही नाही ..
पण हे क्षण सोसायला .. मन ही मज जवळ नाही ..

Thursday, January 5, 2012

nandanlive: जरी बंधिस्त तिथे ही ..

nandanlive: जरी बंधिस्त तिथे ही ..

जरी बंधिस्त तिथे ही ..

देवाने एक विचित्र यंत्र बनवले ..माणूस
नियंत्रण करणारा असतो ज्याला मेंदू विचारी ..
ज्याला दिली त्याने स्मरण शक्ती , निर्णय शक्ती ..
करतो गोळा माहिती सर्व अवयावांकडून ...
पण एक अवयव बनविला ह्या जीवात ...
ज्याचे अस्तित्व ना दिसते लवकर ..
ज्यास अंतरात ही देवाने खूप ठेवले सांभाळून ..
अन तेही एका पिंजर्यात ..!
बंधिस्त त्याला परवा नसते नियंत्रण करणार्याची ..
अन नसते स्वतः च्या वेदानाची ...
संबंध नाही ठेवत कधी तो ऐकण्यास कानांना ..
अन न पाहण्यास नेत्रांना ..
जरी असतो पिंजर्यात .
मानतो स्वताची हुकुमत हृदयात .
ना दिसणाऱ्या ह्याची जाणीव नसते कधी कुणाला ..
जरी जाहली एकवार ... तरी उमगते क्वचीताला ...
मर्जीचा मालक पण ... मर्जी सदैव राखतो दुसर्यांची ..
स्पंदनातूनही स्वतःच्या चालवितो पूर्ण शरीराला .
विचार नाही करत म्हणून अडखळतो कित्येकता ....
पण विचार करत बसला तर .. अडकवेल सर्व क्रियांना ..
थांबव कुणासाठी ह्याची अनुमती नाही त्याला ..
बंधिस्त कारात .. थांबतो फ़क़्त विचारात .
कोणाशी बोलाव , काय बोलाव .. सर्व निर्णय बुद्धीचे ..
पण समोरच्याने काय बोलाव .. हा विचार फ़क़्त त्याचाच ..
बंधिस्त त्याला कधी मोकळ कराव .. मनसोक्त जगू द्यावं ..
पण पिंजर्यातला हा नाजूक जीव .. खरच समजेल का ह्या बाह्य जगाला ?
विसंगत विचार त्याचे पटतील का तरी कधी कुणाला ?
जर पटले तर घ्या त्याला तुम्ही आपल्या जवळ ...
साथ भेटेल त्याला तुमची ...जरी बंधिस्त तिथे ही ..

nandanlive: तू पण असाच केला असता का ?

nandanlive: तू पण असाच केला असता का ?

तू पण असाच केला असता का ?

माझ्या जागेवर असता तर काय केला असत ?
प्रश्न फार सोपा वाटतो .

पण निर्णय तुझाच विचार करून घेतलाय ..
हे समजावन तुला जरा कठीण वाटतंय ....

नाही पटणार वागण तुला माझ ..
रुक्ष वाटतील बोल माझे ...

सदैव मी म्हणतो .. हे असाच होणार .. ते होणारच होत ..
पण कधी समजल नाही तुला .. ते सर्व माझ्या हातातच नव्हत ...

फुशारक्या मारल्या असतील कित्येक चौकासतेच्या ...
पण किती निष्काळजी पणे वेळ दवडत होतो ...

आजही वाटते कि असाव जवळ कुणी ...
पण दूर राहण्याची सवयच जणू अंगावळली ...

मलाही तुला हेच विचरायचं एकदा ...
तू पण असाच केला असता का ..
जे मी केला जागा न बदलता ?

nandanlive: अजूनही उरल्यात तुझ्या खुणा

nandanlive: अजूनही उरल्यात तुझ्या खुणा

अजूनही उरल्यात तुझ्या खुणा

नाहीस तिथे तू अजूनही .. माहित आहे मनाला ..
पण पाउल आज ही वळते .. पाहता त्या वळणाला ...

शाश्वतात आजही का भासतेस तू मनाला .....
अन आभास ही तुझा, झंकारून जातो मज वास्तवाला ...

तू आभास की वास्तव .. वळण की मार्ग तोच जुना ...
मार्गावर ही वास्तवातल्या, अजूनही उरल्यात तुझ्या खुणा ...

nandanlive: प्रतीक्षेत पहाटेच्या

nandanlive: प्रतीक्षेत पहाटेच्या

प्रतीक्षेत पहाटेच्या

भेटीत आपल्या झाली सुरुवात हास्याची ..
होती सुरुवात त्यात एकमेकांना जाणण्याची ...

विचार नाही जुळले .. पण मने मात्र जुळली ..
आचार ही होते वेगळे .. पण तेही दोघांस जुळले .

विश्वास न ठेवणारे मनही .. एक आधार शोधू लागले ...
तुला चिन्तताच विचार ही विसावू लागले ..

मन देऊ नाही शकलो .. पण हृदय मला कधी मिळालेच नाही ..
तुला पाहता क्षणी .. पापण्याही कधी मिटल्याच नाही .

एकत्र मार्ग क्रमाला दूरवर .. हात घेऊन जवळ ..
अंतराचे अन वेळेचेही भान नव्हते .. अन होती सांजही जवळ ..

दिवस सरता अंधारात .. तू नजरे आड होऊ लागलीस .
हातही रिकामा माझा ... किर्र अंधारात फक्त ओढ तुझी लागली ..

वाटल अंधारात दूर गेलीस तू .. वाटल साथीस इथवरच होतीस तू .
पण हुंदक्यात तुझ्या ... अखेर मला भेटलीस तू .

ओढ क्षणिक होती ... की बंध जीवनभराचे ...
सुटलेल्या हातां पेक्षा .. वेध होते फक्त तुझ्या हुंदक्यांचे ..

हुंदक्यांना तुझ्या आवरणे जरा कठीणच जाहले ...
अन मी नजरेला तव हातांवरच रोखले ..

वाटेवर पुढच्या .. साथीस तुझ्या अजुन आतुर आहे मी ..
सुरुवात पुन्हा होण्यास .. प्रतीक्षेत पहाटेच्या आहे मी .