भेटीत आपल्या झाली सुरुवात हास्याची .. 
होती सुरुवात  त्यात एकमेकांना  जाणण्याची ...
 
विचार नाही जुळले .. पण मने मात्र जुळली ..
आचार ही होते वेगळे .. पण तेही दोघांस जुळले .
 
विश्वास न ठेवणारे मनही .. एक आधार शोधू लागले ...
तुला चिन्तताच विचार ही विसावू लागले ..
 
मन देऊ नाही शकलो .. पण हृदय मला कधी मिळालेच नाही ..
तुला पाहता क्षणी .. पापण्याही कधी  मिटल्याच नाही .
 
एकत्र मार्ग क्रमाला दूरवर .. हात घेऊन जवळ ..
अंतराचे अन वेळेचेही भान नव्हते .. अन  होती सांजही जवळ ..
 
दिवस सरता अंधारात .. तू  नजरे आड होऊ लागलीस .
हातही रिकामा माझा ... किर्र अंधारात फक्त ओढ तुझी लागली ..
 
वाटल अंधारात दूर गेलीस तू .. वाटल साथीस  इथवरच होतीस तू .
पण हुंदक्यात तुझ्या ... अखेर मला भेटलीस तू .
 
ओढ क्षणिक होती ... की बंध जीवनभराचे ...
सुटलेल्या हातां पेक्षा .. वेध होते फक्त तुझ्या हुंदक्यांचे .. 
 
हुंदक्यांना तुझ्या आवरणे जरा कठीणच जाहले ...
अन मी नजरेला तव हातांवरच रोखले ..
 
वाटेवर पुढच्या .. साथीस तुझ्या अजुन आतुर आहे मी ..
सुरुवात पुन्हा होण्यास .. प्रतीक्षेत पहाटेच्या आहे मी .
No comments:
Post a Comment