औपचारिकता ही फ़क़्त आचरणाचे धडे शिकवते ..
वास्तविकता मात्र जीवन जगायला शिकवते ....
आईची ममता आयुष्याला सुरवात करून देते ..
ताईची माया तुमच्या चुकांना सामावून घेते ..
भाऊ जरी मोठा असला तरी ओरडून सांभाळतो ..
आणि बाबा जरी रागीट असले तरी मनातला भाव त्यांच्या दिसतो ..
आणखी नाती जोडतो आपण काही मैत्रीची , तर काही मनाची ..
पण त्या प्रत्येक नात्यांतून जडते सवय आपुलकीची ..
कदाचित ही सवय , आपुलकी , आणि बंध ...
हेच जोडतात एकमेकांना किंबहुना मनांना, किंवा म्हणा घराला ..
ह्यातल्या एकही धाग्याची उणीव जर भासली ..
तर दुसरा पुढे सरसावतो .. समजावतो ..
पण दूर वसलेल्या मनाला ... जेव्हा ओढलागते नात्यांची ...
अंतरे कापताना ही त्याला .. शुद्ध नसते स्वतःची ...
आजही ती मने तशीच असतील का ? आजही मला जवळ घेतील का ?
का दुरावा अंतरांचा बनतोय दुरावा विचारांचा ?
तेच घर तीच नाती .. तीच मने आणि तीच माणसे ..
समजतील का त्या दूर वसलेल्या मनाला ... आजही ...
No comments:
Post a Comment