चहूकडे हिरवा गालीचा , अन त्यातून जाणारी एक पाऊलवाट ..
जातोय त्यातून पुढे .. सोबत घेऊन गारवा निसर्गाचा ...
ऊन अजुन एवढं नाही .. दवाचा स्पर्श तळव्याला ,अन मनाला ..
धुकंही तसच पसरलेलं भोवती ... सामवून घेण्यास मिठीत ..
अचानक एक सर पावसाची हलकीच येऊन जावी ....
अन ओलावा मनातला वाढवून जावी ....
पाऊलवाट परत चुकवावी रस्ता माझा ...
अन परत तोच सहवास मिळावा मला भोवतालचा ..
कदाचित ह्या वाटेवर आजही काही पाऊल खुणा आहेत ..
वाट मी चुकत आहे .. की हा त्यांचाच पाठपुरावा आहे ?
ऊन जरा वाढत आहे .. अन धुकही विरळ होतंय ...
स्पष्ट दिसणाऱ्या वाटेवर मात्र ... ती पावलं आता नाही दिसत ..
No comments:
Post a Comment