Monday, April 2, 2012

मन भिजायला ......




दरवळणारा गंध मातीचा .. अन गारवा रिमझिमणाऱ्या थेंबांचा
भिजवून जातो आजही मनाला अन शुष्क मातीला ...

भिजता माती चित्र स्फुरते तिच्यात मुर्तीकाराचे ..
अन भिजता मन .. पुन्हा गुंफते विश्व स्वप्नांचे

भिजता माती .. अंकुरतात बीजे जुनी अनेक
मन भिजते अन .. पुन्हा अंकुरतात आठवणी अनेक

ओलावा मातीतला .. वाढवतो समवेत नवजीवानाला
पण ओलावा मनातला .. वाहतो सोबतीस भूतकाळाच्या

भिजणारी माती नवनवीन रूपे साकारते ..
भिजणार मन मात्र जुन्याच आकारात गुरफटते ...

माती भिजायला पुष्कळदा वेध पावसाचे लागतात ....
मन भिजायला ...... एकटेपणाचे कोरडे वारेही पुरतात !

2 comments: