काहीजण सोप्पे मार्ग निवडतात ...
काहींना मात्र पर्यायाच नसतात ...
काहीजण मार्गक्रमाण्यासाठी एकटेच ....
तर काही... काहींच्या वाटेत एकटे
विसाव्यानुसार जर मार्ग निवडले तर ...
एकवेळ रस्त्यावर वाटसरूच नसतील ...
जर मार्ग आणि विसावे दोन्ही बदलतात ...
तर चालावे कोणत्या दिशेने ?
की समोरच्या किर्र अंधारातही धडपडायच नेहमी ...
दूरवरून येणाऱ्या पहाटेच्या शोधात .. ?
खरच एक दिवस थांबून पाहूया ...
जमलंच तर वाट सोडून भटकून जाऊया !!
No comments:
Post a Comment