Monday, January 30, 2012

त्या दूर वसलेल्या मनाला ...

औपचारिकता ही फ़क़्त आचरणाचे धडे शिकवते ..
वास्तविकता मात्र जीवन जगायला शिकवते ....

आईची ममता आयुष्याला सुरवात करून देते ..
ताईची माया तुमच्या चुकांना सामावून घेते ..

भाऊ जरी मोठा असला तरी ओरडून सांभाळतो ..
आणि बाबा जरी रागीट असले तरी मनातला भाव त्यांच्या दिसतो ..

आणखी नाती जोडतो आपण काही मैत्रीची , तर काही मनाची ..
पण त्या प्रत्येक नात्यांतून जडते सवय आपुलकीची ..

कदाचित ही सवय , आपुलकी , आणि बंध ...
हेच जोडतात एकमेकांना किंबहुना मनांना, किंवा म्हणा घराला ..

ह्यातल्या एकही धाग्याची उणीव जर भासली ..
तर दुसरा पुढे सरसावतो .. समजावतो ..

पण दूर वसलेल्या मनाला ... जेव्हा ओढलागते नात्यांची ...
अंतरे कापताना ही त्याला .. शुद्ध नसते स्वतःची ...

आजही ती मने तशीच असतील का ? आजही मला जवळ घेतील का ?
का दुरावा अंतरांचा बनतोय दुरावा विचारांचा ?

तेच घर तीच नाती .. तीच मने आणि तीच माणसे ..
समजतील का त्या दूर वसलेल्या मनाला ... आजही ...

Friday, January 27, 2012

सोडता हात साथीचे

दुपार काही सरत नाही .. सांज ही जवळ येत नाही ..
आज ही जगताना स्वप्नात ... आठवण तिची जात नाही ..

तिच्या दुखःला सोबत सदा, त्या साथ न देणाऱ्या नशिबाची ..
पण मी मात्र त्या दुखःतही शोधतो साथ आजही तिची ..

बोलताना आजही कुठे वाटते, उणीव त्या जाणिवेची ...
जी दबली दोघांची , सोडता हात ते साथीचे ....

आज थांबवताना तुला कधी हात पुढे नाही सरसावणार ...
पण पापण्यांची ती धडपड... कदाचित आजही नाही थांबणार ...

Saturday, January 21, 2012

nandanlive: ती एक भेट ...

nandanlive: ती एक भेट ...

ती एक भेट ...

काही भेटी निरंतर आठवणीत राहतात ...
तर काही भेटी अखेरच्या ठरतात ...

काही भेटींना आपण विसरू नाही शकत ...
तर काहीना भेटतो विसरण्यासाठी ..

काही भेटी एकमेकांना समजण्यासाठी ..
तर काही भेटी समजावण्यासाठी .

काही असतात नैमित्तिक ..
तर काहींना सतत शोधतो निमित्त.

काही भेटी मध्ये उलगडतो जाळे प्रश्नाचे ..
तर काहीं मध्ये गुंततात गाठी अनेक प्रश्नांच्या ...

काही भेटी असतात क्षणभर ..
तर काहींना असतात अपुरे सारे क्षण .

सुरुवात असो की शेवट ..
पण सगळ्यात निश्चित असते ती एक भेट .

Wednesday, January 11, 2012

nandanlive: मन ही मज जवळ नाही ..

nandanlive: मन ही मज जवळ नाही ..

मन ही मज जवळ नाही ..

छान बोलतोस तू अस जेव्हा ती म्हणते ...
मन तेव्हा म्हणत तुलाच एकाव असं मला वाटते ..

कविता ही छान करतोस अस जेव्हा ती म्हणते ...
मन तेव्हा म्हणत तुलाच स्मरुण ती सुचते ...

कधी ती म्हणते , खूप हळवा आहेस तू ...
मन तेव्हा म्हणत , झालोय जशी आहेस तू ..

कधी ती विचारते , काय करत आहेस ...
तिला कोणी सांगाव मनात तूच आहेस ...

कधी ती म्हणते .. जमेल का माझी सोबत ...
मन तेव्हा म्हणत .. असावी तुझीच संगत ...

कधी ती म्हणते ... मार्ग आपले वेगळे झाले तर ...
तेव्हा मन मात्र काहीही म्हणत नाही .

आज तीने विचारलं नाही , अन ती समोरही नाही ..
पण हे क्षण सोसायला .. मन ही मज जवळ नाही ..