Wednesday, August 29, 2012

तुझी सवय

तू असतीस सोबतिला तर काही फरक असता माझ्यात ..
तू नसतानाही फरक वाढतोय माझ्यात ..

कधी न थांबणारे हसणे , आज चटकन संपते ..
मन मात्र वेडे दुसरीकडे भिरभिरे .

शांत बसताना कित्येकदा हसू गालावर यायचे ..
आता मात्र अश्रु गालावरून सरके .

थांबवताना तुला , हात तुझा कित्येकदा खेचला ..
पण आज सुटलेला हात , मीच मागे घेतला .

तू सोबत नाहीस याची खंत मनाला लागून आहे ...
तू आहेस ह्यातच मनाला रमवून आहे .

वेळ सरकता कदाचित , चित्रे ही बदलतील ..
पण तुझ्या चित्रांची वेळ , मनात थांबली आहे .

सोबतीस असताना अनेकदा भिन्नतेचे क्षण चिंतले ..
आज ते जगताना तुझ्या सोबतीस स्मरले .

सवय तुझ्या सोबतीची चटकन जडून गेली ..
पण सवय एकटेपणाची, तुजसम अजुन दूरच आहे ..

प्याला था जिंदगी

जाम इतना भी न था प्यालेमें
के हम डूब जाते उसमें |
तुने अपने हाथोंसे पिलाया .
हम खो गए उसमें |

प्याला था जिंदगी ,
और जाम थी ख़ुशी |
बस तेरे साथसे
हम जिलिये जिंदगी |

Sunday, August 26, 2012

त्याच किनाऱ्यावर

तोच काळभोर गडद .. मात्र थंड दगड ,
सागराच्या लाटांना सारखा धडकत ...

त्याचा गडद रंग आणि कठीणपणा
त्याच ठिकाणची त्याची स्तब्धता ...

कधी गल्बतांना देत आधार ..
कधी भटकयास देण्या आराम ..

विक्षिप्त राहून जमिनी पासून ..
अन किनाऱ्यावर सागराच्या

साथ देण्यास तुम्हाला हा एकटा
भेटेल परत त्याच किनाऱ्यावर ....

Sunday, June 17, 2012

तुझे वास्तव्य

तू हवा आहेस , जी दिसत नाहीस अन स्पर्शून ही जातेस ...
की आहेस पाणी , जी जवळ घेताच माझ्यात मिसळतेस ?

तू आहेस का उन .. जे देते उब मला पहाटेच्या गारव्यात
की ढगांची सावली .. जी सुखावते तापत्या उन्हात ?

का शोधतोय तुला असताना तू माझ्या भोवताली ...
की खेळतेस मज सोबत लपंडाव आजही ?

तुझे वास्तव्य तू अदृश्य करून घेताना .....
कधी विचारलेस का ह्या भिरभिरणाऱ्या डोळ्यांना ?

Monday, June 11, 2012

नात्यांच्या सीमा

नात्यांना कोणत्याही सीमा नसतातच मुळी ..
उगाच काहीजण त्यांना आकसतात किंवा सीमेत बांधतात ..

मनापासून जडणारे आणि आपले मन मोकळे करणारे .
कधी स्वतःचे तर कधी समोरच्याचे .

अपेक्षांचे ओझे कधी बंधनांच्या सीमांना आकसतात ..
तर कधी स्वातंत्र्याने त्यांतील सीमाही वाढवतात ..

परत भेटू केव्हातरी, ह्या आशेवर जपताना नाते ...
वेळही कशी एकदम भुर्कन उडून जाते .

द्वेषाने किंवा वास्तवाने , नात्याच्या रूपांतरात न अडकता
एक नवे नाते जपण्यापेक्षा, तेच जगवण्याचा प्रयत्न करू ..

Wednesday, June 6, 2012

दर वर्षीचा तोच पावसाळा

दर वर्षीचा तोच पावसाळा,
तीच माती आणि तेच चिंब भिजणारे आपण ...

काहीही बदलत नाही .. वर्षे सरकतात
आणि दर वर्षीच्या पावसाचीही ओढही तीच .

पण त्याच पावसामध्ये शिंपडणारे पाण्याचे थेंब ..
ते मात्र दर वेळेस नवीन असतात ...

पण ते थेंब नवे .. जेव्हाही येतात
अनेकदा जुन्या आठवणी आपणास देतात ..

साठवताना थेंब .. चटकन तो कुठे तरी विरून जातो ..
पण आठवणींच्या ओंजळीत एक मोती आणखी भरतो ..

अंगावरून ओरघळणारा थेंब परत नव्याने भेटूया सांगतो ..
मात्र जुन्या आठवणींना परत एकदा उजाळून जातो.

Tuesday, May 29, 2012

social networking

मैत्री म्हणजे outdated झालेल्या orkut वरून Facebook ची लागण ..
बरे त्यात google + पुढे न आला .. अथवा त्यावरही करा स्थलांतर ...

आपलीच एखादी status update करून ... स्वतःच like करावयाची ..
मुलीने लिहीलीतर मात्र .. reply साठी रांगच लावायची ..

profile इतरांच्या चघळण्यात दिवस कसबसा निघून जातो ..
पण friends list मधल्यांना आपण क्वचितच पुसतो ..

विरंगुळ्याला लोकांनी मात्र ... सवयीची जागा दिली ....
सामाजिक बांधिलकी मात्र .... social networking मध्येच अडकली ....