Thursday, May 5, 2016

प्रश्न तुझे




प्रश्न तुझे आजही तसेच दिसतायेत 
जे उत्तरात गरज मजला  भासावतायेत . 

तुझे प्रश्न फ़क़्त तुझ्या समस्या दाखवतात . 
अन उत्तरात मात्र मला दोष देतात . 

निर्णयांना तू  माझी संमती विचारतेस  . 
पण प्रसंगाचं कारण स्वतः विसरतेस . 

दूर गेल्यावर अंतराचे मोजमाप विचारतेस . 
पण अंतराला वाढताना पाहणाऱ्या मनाला विसरतेस.

त्रास परिस्थितीचा  होता कि माझा ,
अनुकुलातेची अशा हि ठरत होती निराशा . 

कधी चांगला भासतो तर क्रूर कधी  ,
मलाच समजेना बदलतेय कृती कि द्रुष्टी . 

Sunday, January 3, 2016

अहंकार




अहंकार आणि प्रतिष्ठे पायी अनेक मने चीरडताना ,
जाणीवा  तुम्हाला होते, तळपायास  रंग लाल  लागताना . 

मन स्वतःचे मोठे दाखविण्याचा  प्रयत्न करताना,
फ़क़्त तुम्हीच उरता  सामावताना इतरांना. 

मोठेपण अन त्याग तुमचा कुठून तरी शोधता,
अन वास्तविकता लपवण्यात सदैव आक्रोश करता. 

स्वार्थ पूर्ण होता जग गोजिरे भासवता ,
अन त्यात अडचणी दिसता तुम्हीच क्लेश करता .

भरोसा तोवर जोवर जग फिरते गोल ,
अविश्वासू दुनिया असे अंधारात येतात बोल .

नाती परंपरा  ह्या फ़क़्त तुम्हास ठावूक,
पण नात्यां  साठी आम्ही नेहमीच भावूक . 

अस्थिर मन तुमचे पाहते जगाच्या परीक्षा ,
पण उत्तर पत्रिकेने तुमच्या सदैव इतरांच्या उपेक्षा .

सूर्यमालेचा केंद्र,  सूर्यही कधी ग्राहणास  जातो,
पण अहंकार तुमचा  नेहमी ग्रासत असतो  .