किनाऱ्यावरून निघणार्या गलबताला कोणी विचारात का..
... आणखी थोड थांबणार का ?
जिवनातून जाणाऱ्या सुखद क्षणाला आपणही कधी विचारलत का ..
... आणखी लांबवणार का ?
गलबते निघून जातात .. क्षण ही आठवणीत जुडतात ..
मागे राहतो तो फ़क़्त किनारा आणि आपण .. दोघेही एकटेच .
पण सदैव का त्यांनीच वाट पहावी .. कोणाच्या सोबतीची ...
का नाही चिंतू शकत अस्तित्व आपले एकांगी ...
क्षण केव्हातरी परत येतीलच .. अन गलबते ही विसावतील ...
तो पर्यंत जगणे हे तुमचे अन फ़क़्त तुमचेच असते ...
No comments:
Post a Comment