काही मने सदा इतरांच्या मनाचा विचार करतात ..
तर काही मने सदैव आपल्यातच गुंततात ...
काहींना वाटते सर्वे काही नवे नवे ...
तरी काहींनी सोसलेले असतात अनेक पावसाळे ...
काही नियतीशी झगडतात सदानकदा
तर काही विसावतात कवचात आपल्याच अनेकदा .
काही शोधतात उन्हातही गार सावलीचे निवारे
तर काहींना भासतात बंधिस्त ते मोकळे वारे
काहीं तर हरवतात स्वतः ला कित्येकदा
तर काही सांभाळतात वादळात इतरांना अनेकदा ..
काही मने मात्र इतरांना दूर करतात .. विचार करून त्यांच्या सुखाचा
काही जातात दूर .. करता विचार आपल्या मुळे होणाऱ्या त्या दुखांचा
काही मन गप्प राहतात .. तर काही चटकन बोलून जातात ...
काहींच बोलण काळात सामावलं जात नाही ...
तर काहींच बोलणं निरर्थक वाटत .
कृतींच्या अपयशी प्रयत्नात घुसमटलेली मने पहिलीत मी ..
पण अपयशातूनही फुलणारे ते मन आजही शोधतोय मी ...
No comments:
Post a Comment