Monday, February 20, 2012

कण वाळूचा


मरुस्थालावर वावरणाऱ्या वाळूचा कणही सोसतो उष्ण वारे ,
रुक्ष सोबतीने इतरांच्या जमून जाते त्याला ही सारे ...


तळपणाऱ्या भास्कराप्रमाने तोही तळपतो ...
अन शीतल चंद्राचा गारवाही तो संचीतो ....

आली सर एखादी .. चिंब भिजवणारी कुठून तरी ..
त्यातही निमूट पणे बिचारा भिजतो ...

बोचरी सर्दी अन तळपते अंग दोघांना सोसणारा कण तो ..
न जाणे त्या ओलाव्याने मात्र कसा तडकतो .. !

No comments:

Post a Comment