Tuesday, November 22, 2011

nandanlive: अपुरी स्वप्न ...

nandanlive: अपुरी स्वप्न ...

अपुरी स्वप्न ...

स्वप्नांना आपल मानावं, कि वास्तवाला ?
जर वास्तविकता आपली आणि स्वतःशी जवळची म्हटली ...
तर हेच आजचे वास्तव , उद्या भूतकाळ बनते ...

काळा प्रमाणे बदलणारे हे जीवन आणि हे क्षण ...
ह्यात आपले आणि आपल्या सोबत आहे असे म्हणावे ते तरी काय ?

आहे एक गोष्ट , जी खरच अपूर्ण राहिली तर ती आणखीनच जवळची वाटते ...
सदैव आपल्याच सोबत राहते .. आणि काळा नुसार बदलत ही नाही ...

ती म्हणजे आपली .. खरच ज्यांना आपली म्हणून निर्धास्त पणे बोलता येत ....
ती आपली ... विशेषतः आपली अपुरी स्वप्न ....

जरी पूर्ण झाली तरी ती संपत नाहीत ... सुखाच्या अन आठवणींच्या रुपात ..
अन अपूर्ण राहिली तरी .. हव्या असणाऱ्या अनपेक्षित सुखद विचारांत ...

जगातली हीच एक गोष्ट आहे .. जी पूर्ण झाली आणि अपुरी राहिली ..
तरीही ती स्वप्नांच्या दुनियेत जगताना .. सुखावूनच जातात ....
जातात नाही ..... सुखावतात ....

Monday, November 7, 2011

साथ तुमची असुद्या ...

शांत ही बसण्यासाठी खूप विचार करावा लागला ....
अन शब्द ही मिळेनात म्हणून हा जीव कासाविसाला ..

प्रश्न ही माझेच होते आणि समस्या ही माझ्या मनात..
तुला त्या न समजाव्या , हीच खंत प्रश्नात ..

प्रश्न तुला माझे ना उमगले .. अन नाही समजले ..
त्याच प्रश्नांनी आजही मला , माझेच अस्तित्व विचारले ..

चार क्षणाच्या सोबतीत जरी भांडलो कित्येकदा ..
आठवतात ते क्षण अजुन ही .. भासतात समोर अनेकदा

सर्व सोडले असता नियतीवर, वाट पाहत होतो आपण ..
पण सूत्रे घेता नियती कडून ... मन अधीर जाहले संपूर्ण ...

आजही परिस्थती तीच .. जी होती सुरुवातीला ..
पण पाय पुढे मी टाकताच का , दगड समोरचा ढेसळला ?

रुतलेला पाय काढेन प्रयत्नांनी आज वा उद्या ...
ह्या परिस्थितीत जमलंच तर दुरूनच का होइना , साथ तुमची असुद्या ...

Thursday, September 8, 2011

nandanlive: न देण्याची सवयच जणू मला जडली ...

nandanlive: न देण्याची सवयच जणू मला जडली ...

न देण्याची सवयच जणू मला जडली ...

दूर तू गेल्याची जाणीव होऊदे मला ...
अन रिकाम्या हृदयात माझ्या, उणीव भासुदे तुझी मला ...

आठवेल कधी का मी तुला ? प्रश्न सारखा मज पडतो .
प्रश्नाचे उत्तर नसते .. अन तुलाच आठावत बसतो .

नेहमी तूच देत गेलीस , तुझ्या आठवणी मला ...
मी मूर्ख घेतच राहिलो .,आज झाली जाणीव मला .

हातातल्या हाताने तुझ्या ,कधी दुरून हवेत फिरुनी निरोप घेतला ...
अन गुंगावलेल्या स्तब्ध माझ्या हाताने अखेर निरोप ही न तुला दिला .

इथेही न देण्याची सवयच जणू मला जडली ...
पण आजही एक वस्तू माझी आहे हरवली ... माझी आहे हरवली ....

Thursday, December 9, 2010

nandanlive: तुझा अबोला

nandanlive: तुझा अबोला (silence)

तुझा अबोला

हसण्याचा गंध तुझा ,कधी मला स्पर्शेल का ?
बोल तुझ्या ओठातले बाहेर पडतील का ?

तू असताना ही ,जेव्हा जाणवते भयाण शांतता ...
सोबतीत ही तुझ्या आठवते मला, माझी एकांकिका ..

त्या आणि आजच्या क्षणां मध्ये .फरक एवढाच .
तिथे तू होतीस स्वप्नांत .. अन आज सहवासात ...

तिथे हि होता तो जीवघेणा तुझा अबोला ..
अन इथेही नाही विसावा माझ्या जीवाला .

गत काळातील क्षणांतील कोणत्या क्षणी क्षण तुला आठवू ..
ही कठोरता शमवण्यास... खरच का मी अश्रू ढाळू ..

जरी दिसले तुला रागावणे पुरुषाचे .. पण दिसलेत का तुला कधी ..
साठलेले दव त्या गहिवरलेल्या पापाण्यांतले ...