हसण्याचा गंध तुझा ,कधी मला स्पर्शेल का ?
बोल तुझ्या ओठातले बाहेर पडतील का ?
 
तू असताना ही ,जेव्हा  जाणवते भयाण शांतता ...
सोबतीत ही तुझ्या आठवते मला, माझी एकांकिका ..
 
त्या आणि आजच्या क्षणां मध्ये .फरक एवढाच  . 
तिथे तू होतीस स्वप्नांत .. अन आज  सहवासात ...
 
तिथे हि होता तो जीवघेणा तुझा अबोला ..
अन इथेही नाही विसावा माझ्या जीवाला .
 
गत काळातील क्षणांतील कोणत्या क्षणी क्षण तुला आठवू ..
ही कठोरता शमवण्यास... खरच का मी अश्रू ढाळू ..
 
जरी दिसले तुला रागावणे पुरुषाचे  .. पण  दिसलेत का तुला कधी ..
 साठलेले दव त्या गहिवरलेल्या पापाण्यांतले  ...
No comments:
Post a Comment