स्वप्नांना आपल मानावं, कि वास्तवाला ?
जर वास्तविकता आपली आणि स्वतःशी जवळची म्हटली ...
तर हेच आजचे वास्तव , उद्या भूतकाळ बनते ...
काळा प्रमाणे बदलणारे हे जीवन आणि हे क्षण ...
ह्यात आपले आणि आपल्या सोबत आहे असे म्हणावे ते तरी काय ?
आहे एक गोष्ट , जी खरच अपूर्ण राहिली तर ती आणखीनच जवळची वाटते ...
सदैव आपल्याच सोबत राहते .. आणि काळा नुसार बदलत ही नाही ...
ती म्हणजे आपली .. खरच ज्यांना आपली म्हणून निर्धास्त पणे बोलता येत ....
ती आपली ... विशेषतः आपली अपुरी स्वप्न ....
जरी पूर्ण झाली तरी ती संपत नाहीत ... सुखाच्या अन आठवणींच्या रुपात ..
अन अपूर्ण राहिली तरी .. हव्या असणाऱ्या अनपेक्षित सुखद विचारांत ...
जगातली हीच एक गोष्ट आहे .. जी पूर्ण झाली आणि अपुरी राहिली ..
तरीही ती स्वप्नांच्या दुनियेत जगताना .. सुखावूनच जातात ....
जातात नाही ..... सुखावतात ....
No comments:
Post a Comment