शब्द जणू आटून गेलेत ,
ओठ जणू रुक्ष झालेत ,
डोळ्यांचे गती अचानक स्थिरावालीय,
कान फक्त एका चाहुलीची वाट पाहतायत ,
विचारांनी आपले अश्व केव्हाच दावणीला बांधलेत ,
श्वास गती मंदावून साठवू पाहतोय गंध तुझ्या सहवासाचा .
हातांना तर तुझी साथ हवी आहे हातात ,
पायांनी घेतलाय विसावा केव्हाच तुझ्या प्रेमळ छायेत.
आता उरले आहे मज जवळ फक्त मन माझे ,
पण तेही झिडकारून बंधने माझी ,
आश्रय मागते तुझ्या मनात .
फक्त एक होकार तुझ्या ओठांतून निघणारा ,
तुझी एक नजर माझ्या नजरेला भिडणारी .
ह्या दयनीय अवस्थेत आज मी केवळ तुझ्या .....
फक्त तुझ्या सोबतीला आसुसलेलो आहे .
No comments:
Post a Comment