खरच हे जीवन एका मृगजळा सारखेच आहे.
सदैव माणूस न मिळणाऱ्या गोष्टींच्या,
ध्यासाने चालत राहतो .. धडपडतो .
 
कित्येकदा मृगजळ समजून तो ,
हातातल्या गोष्टीनाही भ्रम समजतो.
खरच ह्याचे अस्तित्व कोण बरे ठरवितो ?
आपले डोळे , मन , का आपला मेंदू ?
एका अर्थाने पाहिले तर हे पडसाद आहेत,
थकलेल्या , हरलेल्या मनाचे ...
जे गाठू पाहतात स्वप्ने  अल्पश्या प्रयत्नांत...
पण  काहीना हे मृगजळ , म्हणजे असते 
अशा , उमेद   .....
जी  हाथ देते निराशेच्या भवसागरातून.
ओढ जिची घेते  सर्व संकटांचा समाचार.
मग  ह्याला खोट मानून त्रस्त व्हायचं ?
का ह्याचे अस्तित्व जाणून प्रयत्नात राहायचं ?
No comments:
Post a Comment