Wednesday, July 7, 2010

Vidamban

मूळ कविता "आज राणी पूर्वीची "
http://www.onesmartclick.com/marathi/bhavgite/aaj_rani.gif

आज राणी पुर्विचेते गिफ्ट तू मागू नको,
कालचे महाग बुके चे बिल तू आठवू नको |

वीकेंडला मौल च्या बाहेर नेहमीचे ते भेटणे,
ब्रान्डच्या मोठ्या दुकानाने लक्ष तुझे वेधणे ,
त्या चमकत्या एवजांची भेट तू मागू नको,
आज राणी पुर्विचेते गिफ्ट तू मागू नको |

खरेदीचे शब्द ओठी तू हळू निश्वसता,
वाजती रडण्याचे गाणे नजर हळूच फिरविता,
त्या फिरण्याची अन खर्चाही आठवण तू काढू नको,
आज राणी पुर्विचेते गिफ्ट तू मागू नको|

रोखुनी पलकांत पाणी घाव सारे साहिले,
अन रिकाम्या पाकिटाचे , मीठ डोळ्या चोळीले,
या घडीला मोतियांचा हार तू मागू नको,
आज राणी पुर्विचेते गिफ्ट तू मागू नको.

काय बोलू धाप लागे ,क्रेडीट कार्डाचे बिल पाहिले का?
पगार क्रेडीट होण्याचे सुख कधी , बँक अकाउंटला लाभेल का?
नित नवी बिले भराया कार्ड तू मागू नको .
आज राणी पुर्विचेते गिफ्ट तू मागू नको.

---------------------------------------
विशेष आभार मित्रांचे,ज्यांनी काही अवघड शब्दांचे अर्थ समजावून सांगितले.

No comments:

Post a Comment