दुपार काही सरत नाही .. सांज ही जवळ येत नाही ..
आज ही जगताना स्वप्नात ... आठवण तिची जात नाही ..
तिच्या  दुखःला सोबत  सदा, त्या  साथ  न देणाऱ्या  नशिबाची  ..
पण मी मात्र  त्या दुखःतही  शोधतो साथ आजही तिची ..  
बोलताना आजही कुठे वाटते, उणीव त्या जाणिवेची ...
जी दबली दोघांची , सोडता हात ते साथीचे ....
आज थांबवताना तुला कधी हात पुढे नाही सरसावणार ...
पण पापण्यांची ती धडपड... कदाचित आजही नाही थांबणार ...
No comments:
Post a Comment