Thursday, February 9, 2012

त्या लाटा



किनाऱ्यावर सागराच्या उभा होतो , जाण्यास जवळ निळ्या गालिच्याच्या ,
पण लाटा सागराच्या रेखाटत होत्या अनेक रेखा बंधनाच्या ....

प्रत्येक पावलावर उमटत होत्या अनेक रेषा..
रेखा होत्या त्या... की अडथळे वाळूचे ..

येणाऱ्या लाटा का प्रतिकारत आहेत माझ्या पावलांच्या ..
सोडून किनारा येतोय जवळ त्यांच्या .. का हेही नाही मनात त्यांच्या ..

स्तब्ध राहता किनाऱ्यावर मी ,
बोलली लाट एक त्यातली ..

निळसर अथांग सागर लोभवेल तुला ,
असीमित संपत्ती दडलेली आत सुखावेलही तुला ,

पण मार्ग परतीचा नाही सोप्पा तेवढा ...
क्षारता अनेक डोळ्यांची लाभलीय या समुद्राला ...

No comments:

Post a Comment