वाट पाहताना उजाडण्याची काळोखाच्या सर्व छटा पहिल्यात मी ..
प्रत्येक छटा भरत होती रंग विरहाचे मम जीवनात ...
 
त्यांसोबत चित्र साकारताना कुठे वाटल अजुन उजाडेल काही वेळात ...
ती  वेळही सरत आहे . मज जवळ येत आहे ....
 
काही क्षणच उरलेत .. अन सर्व चित्र बदलेल जीवनाचे ..
पण पुढच्या उजेडाला अजूनही ग्रहण आहे दाट धुक्याचे ..
 
आता धुकं ही सरल अन प्रकाश जणू पसरला भोवताली ..
अन त्यामधून  प्रतिमा हलकीच तुझी डोकावली ..
 
समोर येताच तू विसरलो मी त्या गर्द छटा काळोखाच्या ..
ते चित्र विलक्षण एकाकी पणाचे..
 
पण पाहून तुला का वाटते मनाला अजूनही हे  वास्तव नाही ...
परत मावळतीच्या  वेळेस तोच अनुभव येईल का पदरी  ...
 
पुन्हा  ती आसुसलेली नजर,  परत  एकदा पहाटेच्या दिशेने जाईल ....
अन सोबतीचा अंधार मात्र  ...  कायमचा माझा होईल ...
No comments:
Post a Comment