Saturday, April 28, 2012

आपलं वेगळंपण

सगळ्यांच सारखंच असत , मन कधी नाही मानत .
आपलंच वेगळं करत खुळ , सारख मिरवत असत .

दुसऱ्याला अनुभवाचे बोल सांगता सांगता ...
स्वतःच ते भोगलंय ह्याचा विसर मात्र जाणून करवत .

समोरचे प्रश्न फारच शुल्लक असतात ...
मात्र उत्तर अनुभवांना पसरवेल म्हणून तुम्ही गप्प राहतात.

खरच कधी करतो का आपण मन नेहमी मोकळ ?
का उगाच हसण्यावारी .. मोकळीक दाखवतो इतरांना ?

प्रश्न तुम्हाला पण पडले असतील केव्हातरी ....
पण उत्तरासाठी विचारायच्या प्रश्नांच्या विचारात ही पडता तुम्ही.

परिसरातील साम्यतेला साधारणपणा समजता तुम्ही;
मात्र आपला वेगळेपणा जपायला .. स्वतः पासूनच वेगळे होत असता तुम्ही.

No comments:

Post a Comment