आज पहिल्यांदा वाटतंय उत्तरांमध्ये अडखळतोय,
आज पहिल्यांदा मीच प्रश्नांना शोधतोय. 
आज प्रसंगांना सामोरे ज्यांची कुवत असताना,
परत पाउल मीच मागे खेचतोय. 
वसंतात येणाऱ्या नव पालवीला का जणू ,
मीच कोठे तरी कोमेजतोय. 
सुखांची चाहूल समोरून येताना,
वळणावर मार्ग मीच कुठे तरी बदल्तोय. 
स्तब्ध राहण्याच्या प्रयत्नामध्ये ,
मीच कुठे तरी अस्थिर होतोय… 

No comments:
Post a Comment