नात्यांना  कोणत्याही सीमा नसतातच मुळी ..
उगाच काहीजण त्यांना आकसतात  किंवा सीमेत बांधतात ..
मनापासून जडणारे आणि आपले मन मोकळे करणारे .
कधी स्वतःचे तर कधी समोरच्याचे .
अपेक्षांचे ओझे कधी बंधनांच्या सीमांना आकसतात ..
तर कधी स्वातंत्र्याने त्यांतील सीमाही वाढवतात ..
परत भेटू केव्हातरी, ह्या  आशेवर जपताना नाते  ...
वेळही कशी एकदम भुर्कन उडून जाते .
द्वेषाने किंवा वास्तवाने , नात्याच्या  रूपांतरात न अडकता  
एक नवे नाते  जपण्यापेक्षा, तेच  जगवण्याचा प्रयत्न करू ..
No comments:
Post a Comment