Sunday, June 17, 2012

तुझे वास्तव्य

तू हवा आहेस , जी दिसत नाहीस अन स्पर्शून ही जातेस ...
की आहेस पाणी , जी जवळ घेताच माझ्यात मिसळतेस ?

तू आहेस का उन .. जे देते उब मला पहाटेच्या गारव्यात
की ढगांची सावली .. जी सुखावते तापत्या उन्हात ?

का शोधतोय तुला असताना तू माझ्या भोवताली ...
की खेळतेस मज सोबत लपंडाव आजही ?

तुझे वास्तव्य तू अदृश्य करून घेताना .....
कधी विचारलेस का ह्या भिरभिरणाऱ्या डोळ्यांना ?

No comments:

Post a Comment