Thursday, May 5, 2016

प्रश्न तुझे




प्रश्न तुझे आजही तसेच दिसतायेत 
जे उत्तरात गरज मजला  भासावतायेत . 

तुझे प्रश्न फ़क़्त तुझ्या समस्या दाखवतात . 
अन उत्तरात मात्र मला दोष देतात . 

निर्णयांना तू  माझी संमती विचारतेस  . 
पण प्रसंगाचं कारण स्वतः विसरतेस . 

दूर गेल्यावर अंतराचे मोजमाप विचारतेस . 
पण अंतराला वाढताना पाहणाऱ्या मनाला विसरतेस.

त्रास परिस्थितीचा  होता कि माझा ,
अनुकुलातेची अशा हि ठरत होती निराशा . 

कधी चांगला भासतो तर क्रूर कधी  ,
मलाच समजेना बदलतेय कृती कि द्रुष्टी . 

Sunday, January 3, 2016

अहंकार




अहंकार आणि प्रतिष्ठे पायी अनेक मने चीरडताना ,
जाणीवा  तुम्हाला होते, तळपायास  रंग लाल  लागताना . 

मन स्वतःचे मोठे दाखविण्याचा  प्रयत्न करताना,
फ़क़्त तुम्हीच उरता  सामावताना इतरांना. 

मोठेपण अन त्याग तुमचा कुठून तरी शोधता,
अन वास्तविकता लपवण्यात सदैव आक्रोश करता. 

स्वार्थ पूर्ण होता जग गोजिरे भासवता ,
अन त्यात अडचणी दिसता तुम्हीच क्लेश करता .

भरोसा तोवर जोवर जग फिरते गोल ,
अविश्वासू दुनिया असे अंधारात येतात बोल .

नाती परंपरा  ह्या फ़क़्त तुम्हास ठावूक,
पण नात्यां  साठी आम्ही नेहमीच भावूक . 

अस्थिर मन तुमचे पाहते जगाच्या परीक्षा ,
पण उत्तर पत्रिकेने तुमच्या सदैव इतरांच्या उपेक्षा .

सूर्यमालेचा केंद्र,  सूर्यही कधी ग्राहणास  जातो,
पण अहंकार तुमचा  नेहमी ग्रासत असतो  . 

Saturday, December 26, 2015

Its not your fault,



Its not your fault,
Even year is changing, clock is ticking..

Its not your fault,
Time is changing into memories...

Its not your fault,
I am at the same point....

Its not your fault,
That I believed in you more than me....

Its not your fault,
That I see you in-front of me...

Its not your fault,
We see each other by eyes.....

Its not your fault,
We understood each other by words...

Its not your fault,
That today emotions are just a status....

Its not your fault,
But still you are doing the same.. to prove it was my fault ..

Sunday, December 13, 2015

ढूंढ रहे हो

ढूंढते है खाख  में लोग जाने क्या ,
क्या  कभी फ़रमाया गौर  जब वो जहां मुकम्मिल था!

ढूंढ रहे हो गए वक़्त के निशान ,
क्या  कभी संजोगे लम्हे जो साथ चले !

ढूंढ रहे हो खुदको क्या तुम उस ख़ाक में.. 
शायद एहि पल तुमने चाहा था!

Tuesday, June 2, 2015

                                           अशी हि माझी आई ...


आज  कितीही  बोललो ओरडलो तरीही
सदैव माझी काळजी करणारी

कित्येकदा रागाने दूर झालो 
तरी स्वतः जवळ घेणारी

कधी समजल नाही तरीही,
शांतपणे समजून घेणारी 

फ़क़्त जगण्यासाठी नाही .
तर इतरांना जगवण्यासाठी जगते

अशी हि माझी आई ...


Friday, February 21, 2014

tere aane ki dastak



tere aane ki dastake kan mein gunj rahi
bas ek hava yaha se gujar rahii..

tu ho darwaje pe shayad dekhane...
anakhe meri harwaqt rah takti rahi


khol darwajaa kai baar dekhaa maine..
khol darwaja kai baar dekhaa maine..

ek khushbu yaad teri dilagayii..
tere aane ki dastak... aaj bhi gunj rahii
 
 
 
tune naa ayungi ye khalita bhej dala ..
par fir bhii dilki tasalii ke liye ..
rah ham takte rahe ...
 tere ane ki dastak ...
 
 
har diwar par likhi hai ye saari kahani..
bas taswir teri dil mein bana rakhi haii..

dekhalena kabhi aakar is garib khane mein..
kya udasi chayi hai tere dur rehnese ...
 
tere aane ki dastak ... aaj bhi gunj rahi...
 

Tuesday, December 10, 2013










आज पहिल्यांदा वाटतंय उत्तरांमध्ये अडखळतोय,
आज पहिल्यांदा मीच प्रश्नांना शोधतोय. 

आज प्रसंगांना सामोरे ज्यांची कुवत असताना,
परत पाउल मीच मागे खेचतोय. 

वसंतात येणाऱ्या नव पालवीला का जणू ,
मीच कोठे तरी कोमेजतोय. 

सुखांची चाहूल समोरून येताना,
वळणावर मार्ग मीच कुठे तरी बदल्तोय. 


स्तब्ध राहण्याच्या प्रयत्नामध्ये ,
मीच कुठे तरी अस्थिर होतोय… 

Saturday, October 26, 2013

 
 
 
 
बस किसी ओर चले जा रहा,
       बिन जाने मंजिल उस ओर  ।
खलिश नहीं चलते रहने पे ,
      बस रास्ते अजनबी है इस ओर  ।
वक़्त  साथ नहीं इस वक़्त वरना  ,
      कोई आशियाँ  आही जाता इस ओर  ।
बस चलते हुए मंजिलपाते तुझे,
      देख मुस्कुरा रहा हूँ इस ओर  ।

Sunday, September 15, 2013

कधी कळत नसत

कधी कळत नसत,  कधी वेळ  दुरावत असते ,
कधी काळात नसत, मन कधी दुखत असते .

कधी कळत नसते , आपण दूर जात असतो
कधी कळत नसते, आपण दुरावत असतो.

कधी कळत  नसते, कोणास नकोसे असतो,
कधी कळत  नसते,  कोणास नाकारत असतो.

कधी कळत नसते,  पावसात चिंब भिजत असतो.
कधी कळत  नसते,  मनात  एक थेंब हि नसतो.

कधी मनात घुमटत,  तर कधी मनाला घुमवत,
कधी दूर मनाच्या तर कधी त्याच गाभाऱ्यात .

कळत नसत पण सारखं काही तरी तेच जुनकहि,
वारंवार का चाचपडत असतो , कधी कळत नाहि..


Saturday, August 31, 2013

mera bharosa...










हारू तुझे हर बार दिल करता है ,
क्या करे  आज तकदीर पे भरोसा ज्यादा है । 

 भूलू  तुझे हर बार दिल करता है ,
भरोसा  याददाश पे फिरसे कुछ ज्यादा है। 

जाऊँ  फिर कही  दूर , दिल करता है ,
दूरियाँ  मिटाने का भरोसा कुछ ज्यादा है। 

बस येही सोचता ,कही रुलानादू तुझे ,
खुदपे भरोसा आज थोडा कम है।  

Tuesday, December 11, 2012

पाउल ( step )



पाउल पुढे टाकताना .
खुणा मागे सोडून जाते ..


पाउल पुढे टाकताना ..
मातीही सोबतीस येते .



पाउल पुढे सरकता ..
अंतर मागील वाढते .



पाउल पुढे सरकता ..
पुढचे अंतर सरते .



पाउल थांबता एक ठिकाणी ..
विश्रांती जीवाला मिळते .



पाउल थांबता वाटेवर ..
वादळ मनात परत फिरकावते ..



अन त्या वादळातल पाउल मग ..
पुढे सरकण्यास पण अडखळते

Saturday, October 20, 2012

jajbaat

जज्बतोंको अपने आज बहादिया मैंने ,
     हर एहसास को अपने भुला दिया मैंने ।

पुछा उन्होंन, हम तो तेरे  अपने थे ,
    दूसरों के खातिर,  हमें भी रुलादिया तुमने  ।

मैं बोला , कदर नथी  इस जहाँको तुम्हारी ,
    संग रहते तोभी तुम  रुसवा  होते  ।

इक्तिज़ा आपकी हर किसीको जीने के लिए ,
    पर आज जिन्दगी भी हमसे बेवफा हो रही  ।

Friday, October 12, 2012


                    New Journey  !!!

A known to both but not much known faces.


I knew she was worried to cross road. As being on same path

I forwarded my hand and she hold it without questioning.



Dont know who was helping whom at that time to cross the road!

Or was that a begining of the New journey !!!

Saturday, October 6, 2012

हवा कुछ थमसी गयी ....

हर  एक शख्स  से पुछा हमने ..
     क्या देखा तुमने खुदा को ?

बस जवाब में फिर सवाल आया ..
   क्या देखा तुमने हवा को ?

अगर खुदा हवा है ..
    तो हवा भी आज घलीज़ है |

सांसे देनी वाली हवाभी आज ..
    दम  किसीकी घुटा रही है |

तो फिर मैंने पुछा , क्यूँ रूकती है  सांसे  
   अगर वो भी उसीने है दी ?

जवाब तो मिलना पाया दोस्तों ...
    लग रहा है , हवा कुछ थमसी गयी ....| 

Friday, October 5, 2012

तुटता मी ...




सकाळ होण्या अगोदर सर्व तारे ...
  हळूहळू  आकाशाच्या निळ्या शालीत गेले  ...

पण एक तारा  तरी एकटाच  टीवटीवत होता ..
   शाल पांघरलेल्यातल्या विचारले एकाने .

तर म्हणतो , उद्या रात्री परत झगमगुच आपण ...
   तुटता मी पूर्ण होतील इच्छा अनेक चकोरांच्या.

Wednesday, September 26, 2012

पाणी अन मन

पाणी अन मन दोघांच एक सारखच असत ,
       एकदम स्वच्छ , ज्यात मिसळल त्याचच   ते असत ..

 पाणी अन मन दोघांच जुळत असत  ,
      एक  दुखवल तर  दुसर डोळ्यातून बाहेर पडत. 

 पाणी अन मन  याचं  सारखं असत,
     थांबल्यावर एक खोलवर जिरत .. तर दुसर खोलवर झुरत .

 पाणी अन मन याचं   सारखं असत,
             एक  वाहताना मागे ओलावा सांडत ...
                            अन दुसर  हसर मागे मनांना जोडून जात . 

  पाणी अन मन याचं  सारखं असत, 
           जगण्यासाठी  दोघांच आयुष्यात समप्रमाण लागत .


पाणी अन मन याचं  सारखं असत, 
                 एकाला पूर तर दुसर्याला उद्रेक असतो .

पाण्यावर  आपण बांध घालू शकतो ..
                 पण मनाला  बांधन कधी जमलं का कुणाला  ! 

Tuesday, September 11, 2012

परत पाहिलं हसताना तुलाही

आज उन तापत आहे ..
परत भेटू जेव्हा येइल सावली ...

आज फार ढगाळल आहे ...
परत भेटू मोकळ्या नभा खाली ...

आज मन जरा भीजल आहे ...
परत भेटू मोकळ्या विचारांनी .

आजही त्याच रूढी अन तीच बंधने ...
परत भेटू मुक्त झालेल्या विचारांनी.

कदाचित जागा माझी बदलली असेल ..
कदाचित मी इथे नसेल ही ...

पण भेटेल जेव्हाही नव्याने तुला ..
परत पाहिलं हसताना तुलाही .......

Thursday, September 6, 2012

उनकी वाह वाह

उनकी  वाह वाह में ..
   हमारी आह दब गयी |

उनकी आवाजसे ....
   हमारी ख़ामोशी  दब गयी |

मांझी हम थे ..
  पर कश्ती उन्हें मिली |

उनके झलकते जाम भी ..
   आँसू  अपने बहा गयी  |

मज़धार में छोड़  हमें ...
  साहिल से वो आसूदाह न हुए  |  

Wednesday, August 29, 2012

तुझी सवय

तू असतीस सोबतिला तर काही फरक असता माझ्यात ..
तू नसतानाही फरक वाढतोय माझ्यात ..

कधी न थांबणारे हसणे , आज चटकन संपते ..
मन मात्र वेडे दुसरीकडे भिरभिरे .

शांत बसताना कित्येकदा हसू गालावर यायचे ..
आता मात्र अश्रु गालावरून सरके .

थांबवताना तुला , हात तुझा कित्येकदा खेचला ..
पण आज सुटलेला हात , मीच मागे घेतला .

तू सोबत नाहीस याची खंत मनाला लागून आहे ...
तू आहेस ह्यातच मनाला रमवून आहे .

वेळ सरकता कदाचित , चित्रे ही बदलतील ..
पण तुझ्या चित्रांची वेळ , मनात थांबली आहे .

सोबतीस असताना अनेकदा भिन्नतेचे क्षण चिंतले ..
आज ते जगताना तुझ्या सोबतीस स्मरले .

सवय तुझ्या सोबतीची चटकन जडून गेली ..
पण सवय एकटेपणाची, तुजसम अजुन दूरच आहे ..

प्याला था जिंदगी

जाम इतना भी न था प्यालेमें
के हम डूब जाते उसमें |
तुने अपने हाथोंसे पिलाया .
हम खो गए उसमें |

प्याला था जिंदगी ,
और जाम थी ख़ुशी |
बस तेरे साथसे
हम जिलिये जिंदगी |