देवाने एक विचित्र यंत्र बनवले ..माणूस
नियंत्रण करणारा असतो ज्याला मेंदू विचारी ..
ज्याला दिली त्याने स्मरण शक्ती , निर्णय शक्ती ..
करतो गोळा माहिती सर्व अवयावांकडून ...
पण एक अवयव बनविला ह्या जीवात ...
ज्याचे अस्तित्व ना दिसते लवकर ..
ज्यास अंतरात ही देवाने खूप ठेवले सांभाळून ..
अन तेही एका पिंजर्यात ..!
बंधिस्त त्याला परवा नसते नियंत्रण करणार्याची ..
अन नसते स्वतः च्या वेदानाची ...
संबंध नाही ठेवत कधी तो ऐकण्यास कानांना ..
अन न पाहण्यास नेत्रांना ..
जरी असतो पिंजर्यात .
मानतो स्वताची हुकुमत हृदयात .
ना दिसणाऱ्या ह्याची जाणीव नसते कधी कुणाला ..
जरी जाहली एकवार ... तरी उमगते क्वचीताला ...
मर्जीचा मालक पण ... मर्जी सदैव राखतो दुसर्यांची ..
स्पंदनातूनही स्वतःच्या चालवितो पूर्ण शरीराला .
विचार नाही करत म्हणून अडखळतो कित्येकता ....
पण विचार करत बसला तर .. अडकवेल सर्व क्रियांना ..
थांबव कुणासाठी ह्याची अनुमती नाही त्याला ..
बंधिस्त कारात .. थांबतो फ़क़्त विचारात .
कोणाशी बोलाव , काय बोलाव .. सर्व निर्णय बुद्धीचे ..
पण समोरच्याने काय बोलाव .. हा विचार फ़क़्त त्याचाच ..
बंधिस्त त्याला कधी मोकळ कराव .. मनसोक्त जगू द्यावं ..
पण पिंजर्यातला हा नाजूक जीव .. खरच समजेल का ह्या बाह्य जगाला ?
विसंगत विचार त्याचे पटतील का तरी कधी कुणाला ?
जर पटले तर घ्या त्याला तुम्ही आपल्या जवळ ...
साथ भेटेल त्याला तुमची ...जरी बंधिस्त तिथे ही ..